भारतात घातपात करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकने आम्हीच दहशतवादाचे बळी आहोत असा दावा केला आहे. मुंबईत एकदाच २६ / ११ झाले पण पाकिस्तानात मात्र १०१ वेळा असे हल्ले झाले आहेत, असे पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी सांगितले.
दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही, त्यामुळे भारताने पाकशी शांततेची बोलणी लवकर सुरू करावीत, अशी मागणी गिलानी यांनी केली. मुंबईत झालेल्या २६ / ११च्या हल्ल्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने पाकला जबाबदार ठरवून भारत-पाक चर्चा थांबवली आहे. या विषयावर बोलताना आमच्याकडे सातत्याने दहशतवादी हल्ले होत असल्याचे सांगत पाकच्या पंतप्रधानांनी दहशतवाद आणि शांतता चर्चा यांची गल्लत करणे टाळायला हवे असे मत व्यक्त केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिलानींनी इजिप्तमध्ये गेल्यावर्षी मनमोहन सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत आम्ही परस्परांतील प्रश्न सामंजस्याने सोडवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
दहशतवाद्यांनाच भारत-पाक दरम्यान मैत्री नको आहे, असे सांगत गिलानींनी भारताने दहशतवादी हल्ल्याचे निमित्त करुन शांतता चर्चा थांबवू नये, अशी मागणी केली
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment